Breaking News

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

मुंबई : प्रतिनिधी

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 6) दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख आणि मगरपट्टा येथील स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांना बुधवारी मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. या कोठडीला आव्हान देत गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असता गोस्वामींना तत्काळ सुटकेचा दिलासा मिळू शकला नाही. फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने या संदर्भात पुन्हा शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी ठेवली आहे. अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावरही शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply