नवी मुंबई : बातमीदार
शहरातील होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेचा विषय यंदाच्या पावसाळ्यामूळे चर्चेत आला आहे. सीबीडी बेलापूर येथील कांदळवने गाळ व इतर रानटी वनस्तपतींमुळे भरलेल्या हँल्डिंग पौंडचा फटका यंदा सीबीडीतील हजारो नागरिकांना बसला असून हे होल्डिंग पौंड स्वच्छ करण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेविषयी सातत्याने मागणी करणार्या स्थानिक भाजप माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी पालिकेच्या वेळकाढुपणावर नाराजी व्यक्त करत थेट कोर्टाची पायरी चढली आहे.
बुधवारी डॉ. नाथ यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली असून त्यानुसार नवी मुंबई महापालिका, कोस्टल डिपार्टमेंट व वनविभागातील कांदळवन विभागा या तिघांना प्रतिस्पर्धी बनवण्यात आले आहे. कोर्टाने तिन्ही प्राधिकारणांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. याबाबत 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
नवी मुंबई शहरात 12 मानवनिर्मित होल्डिंग पौंड आहेत. सिडकोने हे नेदरलँड शहराच्या आधारावर डचपद्धतीने या होल्डिंग पौंडची निर्मिती केली आहे. नवी मुंबईला खाडीने वेधल्याने व हे शहर खाडीवर उभारले गेल्याने अतिवृष्टीत व भरतीत खाडीचे पाणी शहरात येऊ नये व ते शहरापासून दूर अडवले जावे हा यामागचा उद्देश होता. पालिकेच्या निर्मितीआधी शहरातील सर्व मानवनिर्मित होल्डिंग पौंडची स्वछता करण्यात येत होती. मात्र पालिकेची स्थापना झाल्यावर मात्र होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेकडे पालिकेने दुर्लक्ष केले. याचा परिणाम होत या मानवनिर्मित होल्डिंग पौंडमध्ये भरतीच्या पाण्यात वाहून आलेल्या कांदळवनांची बीजांमुळे कांदळवानांनी हे होल्डिंग पौंड भरून गेले. त्यांसोबत गाळ व भरतीच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साठल्याने या होल्डिंग पौंडच्या पाण्याची साठवण क्षमता कमी झाली. डॉ. जयाजी नाथ यांनी अनेकदा सभागृहात आवाज उठवला आहे. नुकतीच त्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली होती. आयुक्त अभिजित बांगर यांनी होल्डिंग पौंडची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याकडे काहीसे दुर्लक्षच झाले आहे. अखेर डॉ. नाथ यांनी पालिकेच्या वेळकाढूपणामुळे कंटाळून बुधवारी (दि. 4) हाँडिंग पौंडची स्वच्छता करण्यास परवानगी द्यावी यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.
होल्डिंग पौंडबाबतची सद्यस्थिती
होल्डिंग पौंडच्या जागेवर झोपड्या उभारून अतिक्रमण झाले आहे. सिडकोने पालिकेकडे हस्तांतरीत केल्यांनंतर पालिकेकडून गाळ काढलाच गेला नाहीही नैसर्गिक कादंळवने नसून खाडीतील भरतीमुळे वाहून आलेल्या बियांमुळे 12 त्व 15 फूट उंच कांदळवने वाढली आहेत.