Breaking News

दिघाटी गावात रेशनकार्ड धारकांना भाजपच्या पाठपुराव्याने मिळाले धान्य

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातील 29 लोकांना मोफत रेशनकार्ड काढले होते. ज्यांमध्ये 60 ते 78 उत्पन्न असलेल्या लोकांना धान्य मिळत नव्हते. तिथे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघाटीचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ पाटील यांनी तहसिलदार पनवेल पुरवठा अधिकारीकडे जाऊन लोकांना धान्य मिळावा याच्यासाठी पाठपुराठा केला.

या वेळी सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, सदस्य मनोहर पाटील, सदस्या स्मिता ठाकूर, वैशाली पाटील,  अक्षता म्हात्रे, हर्षदा पाटील, केलवणे पं. स. अध्यक्ष हिरामण ठाकूर,  ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, पुंडलिक पाटील, प्रभाकर ठाकूर, मच्छिंद्र पाटील, कैलास पाटील, नारायण ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply