Breaking News

अटल करंडकाची ‘ब्रम्हास्त्र’ मानकरी, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ब्रम्हास्त्र या एकांकिकेने बाजी मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 4) रात्री पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला.

पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व निर्माता प्रसाद कांबळी, सन्माननीय अतिथी म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कबरे, भरत सावले, अभिनेत्री शर्वानी पिल्लई, नाट्य निर्माते दिगंबर प्रभू, सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ, नाट्य परिषद कार्यवाह श्याम फुंडे, उद्योजक विलास कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत सुंदरी या एकांकिकेने द्वितीय, निरुपण तृतीय, ठसका चतुर्थ, तर उत्तेजनार्थ बक्षीस बिर्‍हाड एकांकिकेने प्राप्त केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे जावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली, तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली.

वैयक्तिक बक्षिसे खालीलप्रमाणे ः

अभिनय-पुरुष : प्रथम रोहन सुर्वे (ब्रम्हास्त्र), द्वितीय मयूर बोरसे (निरुपण), तृतीय धीरज कांबळे (ठसका), चतुर्थ केदार देसाई (सुंदरी), उत्तेजनार्थ तेजस कुलकर्णी (पिंक इन द रेनबो), संकेत मोडक (37 गुण); स्त्री : प्रथम भाग्य नागर (सुंदरी), द्वितीय ऐश्वर्या मिसाळ (भाग धन्नो भाग), तृतीय कोमल वंजारे (ब्रम्हास्त्र), चतुर्थ आरती बिराजदार (निरुपण), उत्तेजनार्थ सिमरन सईद (बास्टर्ड पेईसो), श्वेता कुलकर्णी (सेकंडहॅण्ड); दिग्दर्शन : प्रथम ब्रम्हास्त्र, द्वितीय सुंदरी, तृतीय निरुपण, उत्तेजनार्थ ठसका; लेखन : प्रथम निरुपण, द्वितीय ब्रम्हास्त्र, तृतीय 37 गुण, उत्तेजनार्थ रंग बावरी; नेपथ्य : प्रथम भाग धन्नो भाग, द्वितीय सुंदरी, तृतीय ब्रम्हास्त्र, उत्तेजनार्थ ठसका; संगीत : प्रथम निरुपण, द्वितीय ब्रम्हास्त्र, तृतीय बिर्‍हाड, उत्तेजनार्थ सुंदरी; प्रकाशयोजना : प्रथम सुंदरी, द्वितीय ब्रम्हास्त्र, तृतीय ठसका, उत्तेजनार्थ निरुपण.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply