Breaking News

आर्थिक नैराश्येत कर्जत येथील तरुणाची आत्महत्या

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील भडवळ गावातील एका 24 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय कनोजे असे या तरुणाचे नाव आहे. आठ महिने रोजगार नसल्याने आपले आयुष्य संपवून टाकले आहे.

नेरळ जवळील भडवळ गावातील सुभाषनगर येथील 24 वर्षीय तरुण अक्षय चंद्रकांत कनोजे या तरुणाने शुक्रवारी (दि. 6) आंब्याच्या झाडाला लटकावून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भडवळ गावाशेजारी असणार्‍या बतीचा पाणवठ्याजवळील झाडाला घरातून नेलेल्या साडीच्या साह्याने लटकावून अक्षय ने आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वडिलांना सांगून घराबाहेर  निघाला होता. साडे दहा वाजायला आले तरी अक्षय घरी आला नाही. म्हणून वडील चंद्रकांत यांनी अक्षयचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास गावाला लागून असणार्‍या बतीचा पाणवठ्याजवळील झाडाला अक्षयचा मृतदेह लटकलेल्या अस्थितीत आढळून आला.

अक्षयने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली साडी ही घरातूनच आणली होती. अक्षयने आत्महत्या केल्याने भडवळ गावात सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे. अक्षयचे गेल्यावर्षी लग्न झाले होते, तर अक्षयची पत्नी ही गरोदर असून तीला आठवा महिना देखील सुरू असल्याचे समजते. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात हाताचे काम गेल्याने अक्षय गेली आठ महिने घरीच होता, या नैराश्यातूनच अक्षयने आपले जीवन संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अक्षयवर पत्नी, आई-वडील, भाऊ यांची जबाबदारी होती त्यातच पत्नी गरोदर असल्याने अक्षय तणाव खाली आला होता.

भडवळ गावातील गेल्या चार महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. या अगोदर देखील एका तरुणाने नैरायष्यातून झाडाला लटकावून आपले जीवन संपवले होते. यापूर्वी गावातील तरुण आणि नेरळ-माथेरान टॅक्सी चालक म्हणून व्यवसाय करणारा सचिन पाटील या तरुणाने माथेरान येथील पर्यटन व्यवसाय बंद असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नेरळ पोलीस अधिक तपास घेत आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply