Breaking News

प्रभाग समितींच्या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ आणि ‘ब’ च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये सफाई, अतिक्रमण या विभागांमध्ये अपुर्‍या पडणारे मनुष्यबळ आणि पाण्याच्या समसम्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या वेळी नवनिर्वाचीत सदस्यांचे निवडणूक आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीला पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ चे सभापती अनिता पाटील, प्रभाग समिती ‘ब’ सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, अभिमन्यू पाटील, एकनाथ गायकवाड, संजय भोपी, नितीन पाटील, प्रवीण पाटील, भाजप नेते वासुदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply