Breaking News

मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा अलिबागची अपूर्वा जगात तिसरी

अलिबाग : प्रतिनिधी

पनामा येथे आयोजित मिस टीन युनिव्हर्स 2019 या जागतिक सौंदर्य स्पर्धेत

अलिबागची अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ब्राझील, तर द्वितीय मेक्सिकोच्या सौंदर्यवतीने प्राप्त केला. संपूर्ण जगभरातून भारताचे नाव पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत 28 वेगवेगळ्या देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. चुरशीच्या फेर्‍यांमध्ये ती तिसरी आली. गेल्या डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टीन इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.

जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने मी या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. प्रशिक्षक जसमीत कौर, कुटुंबीय व सर्व रायगडकरांची मी आभारी आहे. -अपूर्वा ठाकूर, मिस टीन युनिव्हर्स

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply