Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

डोंबिवली : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणार्‍या आंदोलनासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, गुलाब वझे, डॉ. दिनेश म्हात्रे, गंगाराम शेलार, दिलीप पाटील, तकदीर काळण, दीपक ठाकूर, दिनेश साळवे, प्रल्हाद जाधव, डॉ. राजेश मढवी, डॉ. तपन पाटील विठ्ठल वायले, गणपत ठाकूर, रमेश कराळे, पांडुरंग म्हात्रे, मोतीराम गोंधळी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply