‘नेमको’ कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप आक्रमक; व्यवस्थापनाला दिले आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवेदनपत्र

खोपोली : प्रतिनिधी

तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील नेमको कंपनीतील स्थानिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी खालापूर भाजप आक्रमक झाली असून भुमिपुत्रावर अन्याय करू नका तसेच नोकरीत भुमिपुत्रांना प्राधान्य द्या अशा आशयाचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे मागणीपत्र खालापूर भाजपने सोमवारी (दि. 14) निमको कंपनी व्यवस्थापनाला दिले. या पत्राची कंपनी व्यवस्थापनाने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. नेमको कारखान्यात सुमार 154 कामगार काम करतात. कंपनी व्यवस्थापन अन्याय करीत असल्याने  स्थानिक कामगारांनी आपल्या व्यथा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासमोर मांडल्या होत्या. खालापूर भाजपच्या प्रतिनिधींनी सोमवारी नेमको व्यवस्थापनाशी चर्चा करीत आमदार प्रशांत ठाकूर यांचे मागणीपत्र दिले. या वेळी स्थानिक कामगारांचे वेतन व बाहेरील कामगारांचे वेतन यातील तफावत, पगाराची स्लिप व बोनस न देणे तसेच इतर विविध मागण्यांची पूर्तता करण्यात यावी आदी विषयांवर भाजप प्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, कोषाध्यक्ष सनी यादव, अंकुश मोरे, श्रीकांत भोईर, महेश कडू, नागेश पाटील, परेश खोपकर आदी उपस्थित होते.

भाजप शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या व निवेदनाबाबत वरिष्ठांशी व कारखाना मालकांशी चर्चा करून त्याची सर्व माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात येईल.  

-महेश पांडे, व्यवस्थापक, नेमको कंपनी, होराळे, ता. खालापूर

नोकरीत स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य द्यावे तसेच स्थानिक व बाहेरील नोकरदार याच्यातील पगार आणि बोनसमध्ये असलेली तफावत दूर करून सर्वांना समान पगार, बोनस द्यावा.

-विठ्ठल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष, रायगड भाजप

आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवेदनपत्र तसेच चर्चेतून नेमको कंपनीतील स्थानिक कामगारांच्या समस्या व्यवस्थापनासमोर मांडल्या आहेत. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. 

-सनी यादव, कोषाध्यक्ष,  रायगड जिल्हा भाजप

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply