रेवदंडा ः प्रतिनिधी – रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांची पुणे शहरामध्ये नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी इन्चार्ज म्हणून पो. नि. अशोक थोरात यांनी पदभार स्वीकारला. रेवदंडा पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पो.नि. अशोक थोरात हे यापूर्वी मुंबईतील भांडूप पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महाराष्ट्र पोलीस सेवेतील 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज म्हणून पो. नि. अशोक थोरात प्रथमच रायगडमध्ये रूजू झाले आहेत. पूर्वीचे पो. नि. सुनील जैतापूरकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे स्वागत केले. सद्यस्थितीत रेवदंडा पोलीस ठाणे विभागात कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय पो. नि. अशोक थोरात यांनी या वेळी व्यक्त केला.