Breaking News

पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश

मुरूड ः प्रतिनिधी – मुंबईतील सहा जणांचा पर्यटक ग्रुप शनिवारी (दि. 7) काशिद बीचवर फिरायला आला असता त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते समुद्रात उतरले तेव्हा ओहोटीची वेळ सुरू होती. त्यातील दोघे पोहताना खोल समुद्रात खेचले गेले. या वेळी तेथे उपस्थित जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मुरूड तालुक्यातील काशिद हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने येथे शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी असते. देशी-विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येथे येतात. शनिवारी मुंबईतील सहा जणांचा ग्रुप काशिद बीचवर फिरायला आला होता. सायंकाळच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात पोहताना त्यांच्यातील दिनेश मोरीये व मोविन अल्मेडा हे दोघे खोल समुद्रात खेचले गेले.

आपण किनारा गाठू शकत नाही हे समजताच त्यांनी मदतीची याचना केली. तेव्हा तिथे असणारे जीवरक्षक राकेश रस्ते व अमोल कासार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात काही अंतर पार करून दोघांना सुखरूप किनार्‍यावर आणले. या दोन पर्यटकांना किनार्‍यावर आणताच येथे कर्तव्यावरील पोलीस नाईक विलास आंबेतकर व होमगार्ड विकास वाघमारे यांनी पर्यटकांच्या पोटात समुद्राचे पाणी गेल्यामुळे त्यांना उपडे करून तोंडातून पाणी बाहेर काढून धीर दिला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply