Breaking News

खोपोलीत लैंगिक शिक्षण मार्गदर्शन

खोपोली : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 30) खोपोली हिंदी विद्यालय आणि वासरंग येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात विशेष उपक्रम राबविला. त्यात खोपोलीतील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष कटकदौंड यांनी विद्यार्थ्यांना आणि पुणे येथील डॉ. विशाखा पवार व डॉ. रेश्मा रणदिवे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सिंग, सहशिक्षक एम. इ. पाटील, बी. आर. पाटील, रेश्मा बांदल, मीनाक्षी प्रचंडे, नीलिमा चनेल, जे. एम. नखादे, एस. एस. देशपांडे तसेच लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता पाटील, सहशिक्षक संगीता पाटील, एन. एम. सकपाळ, आर. एस. भोसले, पी. पी. फराट, डि. के. ठाकरे, एस. एस. पाटील, डी. आर. पाटील, एल. वी. पाटील, एम. आर. घोडविंदे, माया कांबळे  तसेच डॉ. संगीता केजरीवाल यांचे सहकार्य लाभले. सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, महिला संघटक निलम पाटील, कार्यवाह अखिलेश पाटील, सचिन गवळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply