पनवेल : रामप्रहर वृत्त – उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सन 2020 मध्येही चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात शिकणाया इयत्ता पाचवीच्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (झणझड) तसेच इयत्ता आठवीच्या नऊ विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (झडड) शिष्यवृत्ती संपादित केली आहे. इतक्या मोठया संख्येने शिष्यवृत्ती मिळवणारी पनवेल तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी करिता ज्यादा तासिका घेतल्या जातात तसेच विशेष सराव परिक्षा घेतल्या जातात मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालकांचे सहकार्य या सर्व गोष्टीचे फलित म्हणजे हे यश आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे
पूर्व उच्च प्राथमिक ः कुशल गोस्वमी के-3/153, ऋत्विक पाटील के-25/153, सोहम इंदुलकर के-81/153, सौम्य चार्टजी के-86/153, ऋतुजा म्हात्रे के-115/153.
पूर्व माध्यमिक ः समृध्दी पुरोहित के-7/125, आदित्य कुलकर्णी के-29/125, शाश्वत प्रभू के-32/125, अर्थव चव्हाण के-45/125, यश पांडव के-48/125, सिध्दी भोसले के-55/125, शुभदा देशमुख के-71/125, साक्षी गुप्ता के-121/125, आरती गुप्ता के-122/125.
या यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.