विहिंपतर्फे आदिवासींना फराळ
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील टक्याचीवाडी येथील सुमारे 50 आदिवासी कुटुंबियांना विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी (दि. 14) दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विहिंपतर्फे हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षीही राबविण्यात आला.
मुरुडपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याचीवाडी येथे दिवाळीच्या दिवशी जावून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथील आदिवासी बांधवांना लाडू, चकली, चिवडा, करंजी आदी पदार्थांचे वाटप केले. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे मुरुड प्रखंड प्रमुख दिलीप दांडेकर, सुनिल विरकुड, तालुका संघ चालक दिलीप जोशी, उमेश भायदे, अजित भगत, प्रमोद भायदे, रुग्ण सेवा समितीचे सुरेश वर्तक, मेघराज जाधव, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.