Breaking News

नितीश कुमारच होणार बिहारचे सातवे मुख्यमंत्री

बिहार ः वृत्तसंस्था

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बिहार विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळतील. शपथग्रहण सोहळा सोमवारी (दि. 16) होऊ शकतो. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची रविवारी  नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजपने शब्द पाळला

बिहारमध्ये एनडीएने 122 जागांसहित बहुमत मिळवले आहे. भाजपला 74 जागा मिळाल्या आहेत, तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे 2015मध्ये 71 जागा मिळाल्या होत्या तिथे या वेळी 43 जागांवरच विजय मिळवता आला. भाजपच्या जागा मात्र 53 वरून 74 वर पोहोचल्या. यासोबत भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला. तरीही भाजपने दिलेला शब्द पाळत नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातल्यात जमा आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply