Breaking News

बोंबल्या विठोबाची यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

खालापूर : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खालापूर तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाची यात्रा होणार नसल्याची माहिती खोपोली नगरपालिका व विठोबा मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत देण्यात आली.

धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या साजगाव येथील विठ्ठल रखमाई मंदिर परिसरात दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक कृष्ण एकादशी या कालावधीत मोठी यात्रा भरते. विशेषत: सुकीमच्छी, बैल बाजार, घोंगडी बाजार यासाठी ही यात्रा प्रसिध्द आहे. संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच मुंबई, पुणे येथील भाविक यात्रेला हमखास येेतात.

यापुर्वी अनेक संकटे आली मात्र बोंबल्या विठोबाच्या यात्रेत कधी खंड पडला नव्हता. यंदाही परंपरेनुसार 26 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2020 या कालावधीत बोंबल्या विठोबाची यात्रा भरणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असे असले तरी भाविकांना काही अटी व शर्ती पालकन करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply