जीवितहानी नाही; वाहनांचे मात्र नुकसान
खालापूर : प्रतिनिधी
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 22) सकाळी सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणानंतर सुट्टी संपल्याने द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर रविवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती. आडोशी बोगद्याजवळ सकाळी 11वाजण्याच्या सुमारास एमएच-46बीक्यू-6802, एमएच-43बीई 8054, एमएच-14-एचयू-5262, एमएच-14-एचडी 5311, एमएच-12 पीएन 8498, एमएच 4 जीई 943 या सहा गाड्या एकमेकावर आदळल्या. या अपघातानंतर महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. बोरघाट पोलीस व स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.