कर्जत : बातमीदार
मोठ्या शहरातील लोकांच्या जेवणात आता सेंद्रिय उत्पादनांनी आपली जागा निर्माण केली आहे, त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या वाघ यांनी कर्जत येथे केले. कर्जत तालुका भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने तालुक्यातील आर्डे येथील गोरक्षनाथ मठामध्ये नैसर्गिक शेतीवर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चित्रा वाघ यांनी स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सेंद्रिय शेती आणि त्यापासून बनणारी पिके किती महत्वाची आहेत याची उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. आता मोठ्या शहरातील लोक अधिक पैसे देऊन सेंद्रिय खतांपासून पिकवलेला भाजीपाला खरेदी करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेवून शेतकर्यांनी केवळ भाजीपाला नाही, तर सर्व पिके सेंद्रिय आणि नैसर्गिक खते वापरून पिकवावीत असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान तसेच केंद्रीय कृषीमंत्री यांनी शेतकर्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स पध्दतीने नैसर्गिक शेतीबद्दल मार्गदर्शन केले. त्याचे प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. सेंद्रिय खतांच्या माध्यमातून उपाय शोधणारे प्रमोद कोंडीलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चाचे कोकण प्रदेश संघटक सुनील गोगटे, रायगड जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिरीष कदम, भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, उपाध्यक्ष सचिन म्हसकर, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ वेहले, तसेच स्थानिक रमेश शेळके, संतोष भोईर, नथु कराळे तसेच स्थानिक शेतकरी हरिचंद्र वेहले, जनार्दन म्हसकर, सचिन शेळके, नवनाथ शेळके, अरुण वेहले, मनोहर हरपुडे, वरवींद्र वेहले, परशुराम भोईर, दत्तू शेळके, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– नऊ ठिकाणी आयोजन
भाजप किसान मोर्चाच्या वतीने नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्स पध्दतीने उत्तर रायगडमधील नऊ मंडलांमध्ये प्रक्षेपण केले होते. त्यात कर्जत तालुक्यात आर्डे येथे तर खालापूर तालुक्यातील गोठे खुर्द येथे किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी तर खोपोली मंडलामध्ये अध्यक्ष सुधाकर दळवी यांनी शेतकर्यांसाठी प्रक्षेपण आयोजित केले होते. पनवेल ग्रामीणमध्ये आत्माराम हातमोडे तर खारघर मंडलामध्ये संतोष रेवणे, कामोठे मंडलामध्ये संभाजी चिपळे, कळंबोली मंडलमध्ये रवींद्र पाटील व पनवेल शहर मंडलमध्ये रुपेश परदेशी यांनी राष्ट्रीय परिषद व्हिडीओ कॉन्फरन्स यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित केली होती, अशी माहिती किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी दिली.