Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक मतदारयादीचा कार्यक्रम रद्द

अलिबाग : प्रतिनिधी

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यासाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 31 मार्च रोजी जिल्ह्यात एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम 17 मार्च रोजी कोरोना महामारीमुळे आहे त्या टप्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येऊन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारयादी व चालू निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींपैकी रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतीसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply