Breaking News

मुरूड पोस्टातील आधार कार्ड मशीन बंद

मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांना कमी दरात आधार कार्ड प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र सरकाराने सर्व पोस्ट कार्यालयांस आधार कार्ड मशीन पुरविल्या होत्या, मात्र अधिकार्‍यांच्या निष्काळजीमुळे मुरूड पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड मशीन गेले कित्येक महिने बंद अवस्थेत धुळखात पडली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

आधार कार्ड हे महत्वाचे ओळखपत्र झाले आहे. केंद्र सरकाराने पोस्ट कार्यालयात आधार कार्ड मशीन देऊन नागरिकांना दिलासा दिला खरा मात्र मुरूडच्या नागरिकांना त्यांचा फायदा झालाच नाही. अधिकार्‍यांनी लक्ष न दिल्यामुळे मुरूड पोस्ट ऑफिसमध्ये देण्यात आलेली आधार कार्ड मशीन गेले कित्येक महिने धुळखात पडून आहे. 

 केंद्र सरकारच्या धोरणानुसार आधार केंद्राची सामग्री मुरुड पोस्ट कार्यालयात येऊन पडली आहे, मात्र गेले अडीच वर्षे ही सामग्री पडून आहे. सुरुवातीस प्रशिक्षणाकरिता स्टाफ जाणार, नतंर नेट मिळत नाही व आता चौकशी केली असता आठ दिवसात चालू होईल, असे आश्वासन दिले जात आहे. पोस्ट कार्यालाच्या अधिकार्‍यांनी लवकरात लवकर आधार कार्ड मशीन चालु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुरुड येथील समाजसेवक ललीत जैन यांनी केली आहे.

पोस्टातील आधार कार्ड मशीनचा मदरबोर्ड व अन्य उपकरणे खराब झाल्या होती. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची दुरुस्ती करून घेतली आहे. मशीन सुरू करण्यासाठी टेक्निशियनला बोलावण्यात आले आहे, तो येताच आधार कार्डच्या कामास सुरुवात होईल.

-श्री पंचुळकर, सब पोस्टमास्तर, मुरूड

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply