Breaking News

ढाक डोंगरावरून भाविकांनी आणला गरुडध्वज

देऊळवाडीची यात्रा रद्द, दर्शन मिळणार

कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यातील देऊळवाडी येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे.

सकाळी गरुडध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतु बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थानचे सचिव दिलीप बडेकर, बिपीन बडेकर, प्रभाकर बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजेश बडेकर, दीपक मोरे, हितेश काठवले, राज बडेकर, किरण गायकवाड,  तेजस बडेकर, योगी बडेकर, सोहम बडेकर, सौरभ बडेकर, अविनाश खंडागळे, संकेत बडेकर, निखिल पन्हाळे, प्रकाश बडेकर आदी ग्रामस्थ गरुडध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले होते. तेथील भैरी मंदिरात पुरोहित गजानन उपाध्ये यांच्या हस्ते गरुडध्वजाची पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हे सारे भाविक भक्त देऊळवाडीकडे मार्गस्थ झाले.

देऊळवाडी येथील मंदिराजवळ रविवारी (दि. 29)  डोलकाठी उभी करण्यात येणार आहे. त्या डोलकाठीच्या तुर्‍यावर हा गरुडध्वज बांधण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीचा मोर पिसार्‍याने शिवमंदिरातील शिवपिंडीला वारा घालून ही तीस फुट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन नाचविण्यात येते. यंदा कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना शासकीय नियम पाळून दर्शन देण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यास मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply