पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 24) नवे 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 50 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 23) तालुक्यातील 106, उरण 14, पेण नऊ, खालापूर सात, कर्जत दोन आणि अलिबाग, मुरूड व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील दोन आणि खालापूर तालुक्यातील एक आहे. नव्या रु ग् ण ा ंम ुळ े जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,397 आणि मृतांची संख्या 1600 झाली आहे. 53,791 जण कोरोनामुक्त झाल्याने 1006 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …