कन्नड (औरंगाबाद) : प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात शहरातील चारही बुथचा आढावा घेण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) कन्नड येथील साने गुरुजी महाविद्यालय येथे बैठक झाली. भारतीय संविधान दिनानिमित्त या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे त्यांनी पूजन केले. त्याचप्रमाणे कर्मवीर काकासाहेब महाविद्यालय येथे संस्थेच्या सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना संबोधित केले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, सचिव डॉ. संजय गव्हाणे, किशोर आबा पवार, काकासाहेब तायडे, भगवान कोल्हे, नंदकिशोर ढोले, पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष भोईर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …