Breaking News

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांची सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतिपथावर आहे. या कामांचा महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापतींनी गुरुवारी (दि. 26) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मधील प्रभाग क्रमांक 1 येथील धानसर गावात पायाभूत सुविधा पुरविणे, कोयनावेळे व करवले गाव येथे मुलभूत पायाभूत सुविधा विकसित करणे आणि तळोजा पाचनंद व नावडे येथे मच्छी मार्केटचे बांधकाम सुरू असून, ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. या कामांच्या पाहणी दौर्‍याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.
या पाहणी दौर्‍यात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, भाजप नेते वासुदेव पाटील यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या विकासकामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply