नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते, पण कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सेवा सुरू करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
‘डीजीसीए’ने परिपत्रक जारी करून याबाबत आदेश दिले आहेत, मात्र या कालावधीत वंदे भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल तसेच परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …