माथेरानमध्ये महायुतीकडून जल्लोष

नेरळ : बातमीदार

खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने माथेरान शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर माथेरानमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते माथेरानमधील श्रीराम चौकात जमले आणि त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यासह नगराध्यक्ष प्रेरणा सावंत या प्रमुखांनी आणि अन्य कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दरम्यान, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी आणि शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी मावळ गाठून तेथे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. त्या वेळी शिवसेना, युवासेना आणि भाजपचे कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते. माथेरान शहरात श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले असून त्याबद्दल खासदार बारणे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply