Breaking News

श्रीरंग बारणेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ

आमदार बाळा भेगडे यांची ग्वाही

खोपोली : प्रतिनिधी

खासदार श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करुन बारणे यांना मावळ तालुक्यातून 50 हजार मतांची आघाडी मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे येथे प्रचार दौरा केला. या दौर्‍यामध्ये त्यांनी ज्येष्ठ पदाधिकारी, नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि सहकारी कार्यकर्त्यांची भेट घेत नागरिकांशी संवाद साधला.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी या दौर्‍यात माजी नगराध्यक्षा आणि ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुलोचनाताई आवारे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे औक्षण केले. बारणे यांनी माजी आमदार तु. ना. माताडे, माजी नगराध्यक्षा संगीता धोत्रे, अ‍ॅड. रवींद्र दाभाडे,  गोरखनाथ काळोखे, उपनगराध्यक्षा विणा शिंदे, पक्षनेते सुशील सैंदाने, माजी उपनगराध्यक्षा वीणा शिंदे, संदीप गराडे, डॉ. प्रदीप लिमये, चेतन भेगडे, रामनाथ वारींगे, बाळासाहेब शेंडगे, चिरागशेठ खांडगे, राजेंद्र जाधव, गिरीश खैर, शिवाजी भेगडे, आनंद भेगडे, गणपत उर्फ सागर शर्मा, रवी साबळे, रवी आवारे, संदीप काकडे, प्रशांत शाह, अरुण जांभूळकर, राजू नाटक, महेंद्र धारणे, आरएसएसचे गणेश बेल्हेकर, आरपीआयच्या नगरसेविका अनिता पवार, अनिकेत दाभाडे, दिलीप कुलकर्णी, स्वानंद आगाशे, उल्हास भगत, मच्छिन्द्रनाथ काळोखे, नगरसेविका कल्पना भोपळे, रामभाऊ कुल, साहेबराव दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, इंदरशेट ओसवाल आदींच्या निवासस्थानी भेटी दिल्या. त्याचबरोबर शाह कॉलनीमधील साईबाबा मंदिर, वतननगरमधील जैन मंदिर, बालाजी मंदिर, तुळजाभवानी मंदिरात माथा टेकून बारणे यांनी दर्शन घेतले. बॅलाडोर सोसायटीला त्यांनी भेट दिली. भारतमाता उद्यानात फेरफटका मारून उद्यानात आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. तळेगाव स्टेशन येथे अमर हिंद मित्र मंडळाने ढोल ताशांच्या गजरात खासदार बारणे यांचे स्वागत केले. रवी साबळे यांच्या घरी महिलांनी प्रवेशद्वारावर ’मैं भी चौकीदार’ अशी रांगोळी काढून खासदार बारणे यांचे स्वागत केले. सॅमको कॉलनी मैदानात खासदार बारणे यांनी व्हॉलीबॉलच्या खेळात सहभाग घेतला. सिद्धार्थ नगर येथे खासदार बारणे यांनी स्थानिक नागरिक व भाजी विक्रेत्या महिलांशी संवाद साधला. जैन आणि व्यापारी समाजाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, गणेश भेगडे, संतोष दाभाडे, रवी आवारे, संदिप काकडे, रामनाथ वारींगे, रजनी ठाकूर, शोभा भेगडे, ज्योती जाधव, मनोज कासव, माजी युवाध्यक्ष रवींद्र भेगडे, राम कुबेर, विनीत भेगडे, महेश केजरीवाल, संदीप काकडे, नीता काळोखे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, गिरीश करंडे, संदीप शेळके, प्रशांत ढोरे, अरुण भेगडे, रवींद्र आवारे, अ‍ॅड. विजया भांडवलकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा संगीता शेळके, संतोष शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, आप्पा वर्तले, राजू खांडभोर, सिद्धार्थ भेगडे, दत्ता भेगडे, प्रदीप शिंदे, सिद्धनाथ नलावडे, देव खरटमल, सागर सिद्धानकर, सतीश गरुड, सतीश शेलार, सागर जाधव, सदाशिव भोसले, सुनील कारंडे, निलेश पारगे, योगेश पारगे, दर्शन धामणकर, प्रशांत काळे, प्रदीप गडदे, सुनील पवार आदी या वेळी उपस्थित होते.

मागील लोकसभा निवडणुकीत तळेगावकरांनी विश्वास दाखवून मला निवडून दिले. तो विश्वास सार्थ करत मागील पाच वर्षात आपण देशाच्या संसदेत उत्तम कामगिरी केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना मावळ लोकसभा मतदारसंघात राबवल्या, असल्याचे खासदार बारणे यांनी या वेळी सांगितले.

भारताची प्रतिमा उजळविणारे पंतप्रधान, अशी नरेंद्र मोदी यांची जगभर प्रतिमा आहे. त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे देशाचा नावलौकिक वाढत आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून द्यावे.

-श्रीरंग बारणे, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply