Breaking News

विद्यार्थ्यांनी शाळेत फुलवला मळा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून फूलझाडांची व भाजीपाल्याची लागवड केली. याद्वारे त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा धडा गिरवला आहे.

बार्णे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मोकळ्या जागेत काकडी, शिराळी, घोसाळी, दुधी, माठ, भेंडी, पालक, कोथिंबीर, टोमॅटोच्या रोपांची कार्यानुभव या विषयांतर्गत लागवड केली. त्यांनी या रोपांची देखभाल केली आणि थोड्याच दिवसांत मळ्यामध्ये विविध प्रकारची भाजी आली. या पालेभाज्यांचा शालेय पोषण आहारात नियमितपणे वापर केला जातो, तसेच विविध फूलझाडेही जगविण्यात आली आहेत.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले; तर सहशिक्षिका प्रणिता निकम, अस्मिता म्हात्रे, सोनल शिरसाठ यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. भविष्यात व्यावसायिक शिक्षणाची गोडी लावणार्‍या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply