Monday , October 2 2023
Breaking News

रोटरी वोकेशनल अवॉर्डने कोविड योद्धे सन्मानित

पनवेल : वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या वतीने रोटरी मेगा हेल्थ सेंटर, आणि ब्लड बँक हॉल यांना खांदा वसाहत येथे रोटरी वोकेशनल अवॉर्डने समाजातील कोविड महामारीत उत्कृष्ट सेवा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे अध्यक्ष रुपेश यादव यांनी राष्ट्रगीताने केली. या पुरस्कारांचे वितरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयपीडीजी, डीआरएफसी डॉ. गिरीश गुणे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या मेम्बरशीप डायरेक्टर मंजू फडके, आरसीसी डिस्ट्रिक्ट 3131 चेअर अनंत टिकोने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार पनवेल शहरातील डॉक्टरांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आले.

या कार्यक्रमाबरोबरच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या नविन आरसीसी क्लबचे चार्टर, प्रेसिडेंट उदय धुमाळ यांना अनंत टिकोने यांनी प्रदान केले. तसेच मंजू फडके यांच्या हस्ते क्लबच्या सात नवीन सभासदांना रोटरीच्या पिन प्रदान करण्यात आल्या. त्याच दरम्यान, रोटरी फाऊंडेशनसाठी लेवल चार चे डोनेशन दिल्याबद्दल मधुकर नाईक यांना ’पॉल हॅरिस फेलो’ या पिनने गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण आंबेकर, विजय गोरेगांवकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी दिलीप जाधव, इतर सर्व रोटरी व रोट्रॅक्ट सभासद यांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रमाचे नियोजन काही निमंत्रिकांसाहित सामाजिक व सुरक्षित अंतर ठेऊन करण्यात आले होते.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply