पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा तर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याबद्दल तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले. गुरुवारी (दि.11) भाजपचे सरचिटणीस संजय गाते व कोकण विभाग प्रभारी तथा उपाध्यक्ष मनोज भुजबळ, यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले.
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या सुचनेनुसार ओबीसी समाजाच्या संवैधानिक अधिकारचे हनन व राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्या तसे व एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान या संदर्भात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांना ओबीसी मोर्चातर्फे निवेदन देऊन महाराष्ट्र सरकारला याबाबत निर्देश देण्याची विनंती करण्यात आली.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते, शंकरराव वाघ, ओबीसी कोकण विभाग प्रभारी तथा उपाध्यक्ष मनोज भुजबळ, विदर्भ प्रभारी रविंद्र चव्हाण व कार्यालय संपर्क प्रमुख हेमंत भास्कर व संदेश ढवळे उपस्थित होते.