Breaking News

चेन्नईचा विजयरथ रोखला

सहा गडी राखून हैदराबाद विजयी

हैदराबाद : वृत्तसंस्था

डेव्हिड वॉर्नर (50) आणि जॉनी बेअरस्टो (61*) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर सहा गडी राखून मात केली. फिरकीपटू रशीद खानची प्रभावी फिरकी आणि त्याला गोलंदाजांची मिळलेली उत्तम साथ याच्या बळावर हैदराबादने चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 132 धावांत रोखले आणि हैदराबादला 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने 19 चेंडू राखून पूर्ण केले.

133 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली आणि हैदराबादला अर्धशतकी सलामी दिली, पण अर्धशतक पूर्ण केल्यावर वॉर्नर बाद झाला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन ताहिरच्या फिरकीवर 3 धावांवर झेलबाद झाला. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर स्वस्तात झेलबाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला. तो केवळ 7 धावांवर माघारी परतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मात्र संयमी खेळी करीत 39 चेंडूंत अर्धशतक ठोकले. तो 61 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार्‍या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली, मात्र चांगली सुरुवात मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर वॉटसन त्रिफळाचीत झाला. 4 चौकारांसह 31 धावा करून तो माघारी परतला. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिसदेखील उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकार खेचत 45 धावा केल्या.

यानंतर धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भूषवणारा सुरेश रैना मैदानावर आला. तो 13 धावा करून बाद झाला. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ एकच धाव जमवता आली. परदेशी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्स आपली छाप उमटवू शकला नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला. अखेर अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे चेन्नईला 132 धावांपर्यंत मजल मारता आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply