Breaking News

वैज्ञानिकांकडून ग्रीन सिग्नल मिळताच लसीकरण : पंतप्रधान

सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या बैठकीत माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीबाबत शुक्रवारी (दि. 4)  सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. पुढील काही आठवड्यांत कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील देताच भारतात लसीकरण सुरू होईल, असे पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सांगितले. लसीचा साठा व रिअल टाइम इन्फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार केले. कोरोना लसीकरण अभियान व्यापक असेल. अशा अभियानांविरोधात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे तुम्ही लसीबाबत जागरूकता निर्माण करा, असे आवाहनही मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना केले.
या बैठकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांसह केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांचाही समावेश होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद, तृणमूल काँग्रेसकडून सुदीप बंधोपाध्याय, राष्ट्रवादीचे शरद पवार, टीआरएसकडून एन. एन. राव, शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत बैठकीत सहभागी होते. कोरोनाच्या सुरुवातीनंतर त्यावर चर्चेसाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांसोबत केलेली ही दुसरी बैठक होती.
काही दिवसांपूर्वी लस बनवणार्‍या वैज्ञानिकांसोबत माझे बोलणे झाले. आपल्या वैज्ञानिकांना यशाबाबत खात्री आहे. भारतात लशीची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत आहे. त्याचे उत्पादन भारतातच होणार आहे. देशाच्या तीन लशीही विविध टप्प्यांत आहेत. तज्ज्ञांचे मते लसीकरण फार दूर नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोरोनाची लस सर्वप्रथम कोणाला मिळेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, मग फ्रंटलाइन कर्मचारी व वयोवृद्ध व्यक्ती तसेच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार लशीच्या वितरणासाठी वेगाने काम करीत आहे. पंतप्रधानांनी कोरोना लशीच्या दराबाबत स्पष्टपणे काही सांगितले नसले तरी यात अनुदान मिळण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र व राज्य सरकार लशीच्या खर्चावर चर्चा करीत आहे. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन यावर निर्णय होईल.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply