Breaking News

कोरोनाविरोधी बूस्टर डोससाठी तयारी

 नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग सज्ज

नवी मुंबई : बातमीदार

कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून चार दिवसात 36, 356 मुलांचे लसीकरण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील नागरिक यांनाही प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबत 27 डिसेंबरला तातडीने विशेष बैठक घेत या लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केलेले आहे.

यानुसार 10 जानेवारीपासून दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे झालेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. याकरिता महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालये आणि तुर्भे येथील माता बाल रुग्णालय त्याचप्रमाणे 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत हा प्रिकॉशन डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जे आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील नागरिक यांनी 12 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला असेल ते लाभार्थी 10 जानेवारी 2022 रोजी प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असतील.

पात्र लाभार्थ्यांना आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीचा प्रिकॉशन डोस विनामूल्य दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेऊन कोविडपासून अधिक संरक्षण प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply