Breaking News

उरण नगर परिषद मुख्याधिकार्यांची गांधीगिरी

मास्क वापरण्याचे आवाहन

उरण ः प्रतिनिधी – उरण शहरात काही नागरिक मास्क लावताना दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन उरण नगर परिषदेचे  मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शुक्रवारी (दि. 4) विनामास्क नागरिकांना मास्क व गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने मास्क लावण्याचे आवाहन केले.

मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आपल्या कर्मचारी टीमसोबत उरण शहरातील गर्दीच्या ठिकाणी मास्क व गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली. त्याचप्रमाणे पथनाट्य सादर करून मास्क वापराबद्दल जनजागृती करण्यात आली. या वेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी, स्वच्छता व आरोग्य विभागाचे प्रमुख महेश लवटे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगदिश म्हात्रे, हरेश जाधव, धनेश कासारे, चेतन गिरी, महेंद्र साळवी तसेच स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply