Breaking News

अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (दि. 30) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी आली आहे. याबद्दल चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply