उरण ः वार्ताहर – नागरिकांना मतदान नोंदणी करण्यासाठी माहिती मिळावी या उद्देशाने भाजप उरण तालुका व आमदार महेश बालदी यांनी उरण येथे ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी बॅनर्स लावून जनजागृती केली आहे.
मतदान करणे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये ही रास्त अपेक्षा असते. मतदार यादीत नाव येण्यासाठी कोणता फॉर्म भरावा यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मोरा, भवरा तलाव, हनुमान कोळीवाडा, बोरी नाका, पेन्शनर्स पार्क, गणपती चौक, राजपाल नाका, वीर सावरकर मैदान (लाल मैदान), कोटनाका, शेवा चारफाटा (बोकडवीरा पोलीस चौकीसमोर), जेएनपीटी टाऊनशिप प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.