Breaking News

चौल ब्राम्हण समाजाकडून शासनाला मदत

रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी चौल येथील ब्राम्हण समाज या संस्थेकडून पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अशा दोन्हीमध्ये प्रत्येकी 35 हजार म्हणजेच एकूण 70 हजारांची मदत शासनाला देण्यात आली आहे. मदतीचे हे धनादेश संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोगळेकर व सचिव नृपेन विद्वांस यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.

कोरोनाविरुद्ध लढ्यात योगदान म्हणून ब्राम्हण समाज संस्थेने घरोघरी फिरून समाजाकडून लोकवर्गणी जमा केली. जमा झालेले 35 हजार रुपये आणि संस्थेकडे विविध स्वेच्छा देणगीतून जमा असलेले 35 हजार रुपये  असे मिळून ही मदत करण्यात आली आहे.

 संस्था गेले 25 वर्षे ही संस्था चौलमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यामध्ये रक्तदान, आरोग्य शिबिर आदी सामाजीक बांधिलकीच्या कार्याचा समावेश आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply