पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) गौरविण्यात आले.
मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत आणि 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे, तसेच 22 वर्षावरील अशा चार गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी ‘ये दिवाली शांतीवाली’, ‘ध्वनी प्रदूषण टाळा’, आणि ‘वोकल फॉर लोकल’ हे तीन विषय होते.
पनवेल शहर व तालुका भाजप कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, चेतन जाधव, अयुब अकुला, अथर्व गुजर, हितेश स्वामी आदी उपस्थित होते.
पोस्टर स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार आणि ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
पोस्टर स्पर्धेतील गटनिहाय विजेते
गट अ (सात वर्षाखालील) : स्वरा जाधव प्रथम, अदिती बांगड द्वितीय; गट ब (आठ ते 15 वर्षाखालील) : विघ्नेश शाहु प्रथम, प्रार्थना पटेल द्वितीय; गट क (16 ते 21 वर्षाखालील) : केविन दियास प्रथम, वैष्णवी तांबोळी द्वितीय; गट ड (21 वर्षापुढील) : तेजस म्हात्रे प्रथम, उत्तम शाहु द्वितीय.
वक्तृत्व स्पर्धेतील गटनिहाय विजेते
गट अ (सात वर्षाखालील) : सुक्षम भोपी प्रथम, अर्णव जोशी द्वितीय, स्वरा जाधव तृतीय; गट ब (आठ ते 15 वर्षाखालील) : गार्गी म्हात्रे प्रथम, सुहेरा दिवान द्वितीय, आकांक्षा भोपी तृतीय; गट क (16 ते 21 वर्षाखालील) : सुजल जोशी प्रथम, स्वलेहा दिवाण द्वितीय, गायत्री वेटोळ तृतीय; गट ड (21 वर्षापुढील) : वेदिका लांगी प्रथम, प्राची भगत द्वितीय, तब्बसुम खान तृतीय.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …