Breaking News

पनवेल, उरणमध्ये महामानवाला अभिवादन; जासईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम

उरण ः प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र भारतीयांना दिला, असे त्यांनी मनोगतात सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन चरित्राची माहिती दिली. या वेळी गाव अध्यक्ष आणि सल्लगार समिती सदस्य यशवंत घरत, डी. के. पाटील, ठाकूर एस. एम. मुंबईकर, राजू भोईर आदी उपस्थित होते. रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रसायनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन

मोहोपाडा ः प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन रिस येथे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रसायनी परिसरातील पदाधिकार्‍यांनी डॉ. आंबेडकर यांच्या तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहन कांबळे यांनी कविता वाचन करून उपस्थितांची वाहवा मिळवली, तर सम्यक सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन चरित्राची माहिती सांगितली. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र भारतीयांना दिला, असे त्यांनी मनोगतात सांगितले. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र या, संघटित व्हा, सर्वांनी एकत्र आल्यास कोणतेही काम करणे शक्य होते. या वेळी सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने महिला अध्यक्ष रेखा गायकवाड, वैशाली कांबळे, सोनाली दळवी, पूजा झा, दीपक इंगले, सुनील निकाडे, संदीप निकाडे, विठ्ठल पाचपिंडे, मोहन कांबळे, उदय जाधव, सुरेंद्र कसबे, दयानंद सरोदे, हेमंत वानखेडे, जीवन तायडे, फुलचंद लोंढे, संपत पठारे, संतोष खिल्लारे, बाबासाहेब किर्दंकुडे, दत्ता कांबळे, गणेश जावले, राहुल रणखांबे, मलीभाऊ कांबळे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील निकाडे यांनी, तर आभार दत्ता कांबळे यांनी मानले.

रबाळे येथे रक्तदान शिबिर

नवी मुंबई ः प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  64व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रबाळे परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात येतो, मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅण्डल मार्च रद्द करून महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रबाळेतील छत्रपती राजश्री शाहू महाराज विद्यालयातील स्व. सोनी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केले. भाजप नेते माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले की, कोरोनामुळे सर्वच रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेता गरजूंना वेळीच रक्त मिळावे व रक्तदात्यांत असणारेे गैरसमज दूर व्हावे या हेतूने हे शिबिर महत्त्वाचे ठरले. रबाळेचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. नवी मुंबईतील नागरिक व रक्तदात्यांनी रक्तदान त्याचप्रमाणे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. प्रीती सांघाणे यांनी केले. या वेळी माजी नगरसेविका रंजना सोनवणे, डॉ. गौतमी साबळे, अलका ढवळे, जे. पी. सिंग, कमलेश इंगळे, सनी पाटील, दिनेश भोये, अमोल वाघमारे, कृष्णा घाडगे, राजू भाशाळकर आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply