Breaking News

पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅली; मोदींचा जयघोष

पेण : प्रतिनिधी

तालुका भाजपच्या वतीने रविवारी पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते ललित पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, कामगार संघटना अध्यक्ष विनोद शहा, अजय क्षीरसागर, भास्कर पाटील, अभिराज कडू आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅलीची सुरुवात पेण येथील वैकुंठ निवासस्थानापासून करण्यात आली. संपूर्ण पेण शहरात फिरून ही विजयी संकल्प रॅली पेण पूर्व विभाग, आंबेगाव, सावरसई, कामार्ली ते आरावपर्यंत नेण्यात आली. तेथून आराव ते पेण शहर, तरणखोप ते ईरवाडी, गोविर्ले, जिते, खारपाडा येथे विजयी संकल्प रॅली नेण्यात आली. तेथून खारपाडा, कासारभटमार्गे जोहे, दादर, हमरापूरमार्गे वाशी विभाग, वढाव, भाल, भाल ते वाशी नाका मार्गे वडखळ, डोलवी, आमटेम, कोलेटी ते पुन्हा पेण शहरात येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. 

या वेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाईकवर भाजपचा झेंडा फडकत होता. ‘अब की बार मोदी सरकार’ या जयघोषाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply