पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड् महाविद्यालयात एाशीसळपस ढीशपवी ळप एर्वीलरींळेप रपव ठशीशरीलह र्टीरश्रळीूं या विषयावर शनिवार व रविवारी झालेल्या दोन दिवसीय छ–उ स्पॉन्सर्ड राष्ट्रीय परिसंवादात झूम अॅप व फेसबुकवरून 1458 संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. नवीन पनवेलमधील श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड् महाविद्यालयात 5 व 6 डिसेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्ध्याचे कुलगुरू प्रो. रजनीश शुक्ल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, मुंबई विद्यापीठ, ठाणे उपकेंद्राच्या संचालिका डॉ. सुनीता मगरे, प्रगती कॉलेजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. अविनाश शेंद्रे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, संचालिका संगीता विसपुते, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे व अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण व संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर सांगोपांग चर्चा झाली. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, प्रगती कॉलेज डोंबिवलीचे अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अविनाश शेंद्रे यांनी छ–उ व संशोधन आणि शिक्षणातील उदयोन्मुख प्रवाहावर मार्गदर्शन केले. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ तेलंगणाचे कुलसचिव डॉ. मोहम्मद सिद्दीकी यांनी उपस्थितांना उदयोन्मुख प्रवाहावर दिशा दाखवली. या सेमिनारसाठी झूम अॅप व फेसबुकवर 1458 संशोधक उपस्थित होते. देशभरातून तसेच आफ्रिका, घाना, इराक, नेपाळ, कजाकिस्तान, अमेरिका अशा विविध ठिकाणांहून या परिसंवादासाठी संशोधक सहभागी झाले. सेमिनारसाठी 69 संशोधन लेख आले होते, जे णॠउ र्रििीेींशव पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आले. विसपुते बी. एड् महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या यशस्वी सेमिनारमुळे सर्व स्तरातून प्राचार्य डॉ. सीमा कांबळे व त्यांच्या स्टाफचे अभिनंदन होत आहे.