Breaking News

रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) नव्या 75 कोररोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 44 व ग्रामीण 16) तालुक्यातील 60, खालापूर चार, पेण व अलिबाग प्रत्येकी तीन, रोहा व सुधागड प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 58,929 झाला असून, मृतांची संख्या 1614 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 56,506 जण कोरोनामुक्त झाले असून, 809 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply