Breaking News

पेणमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी

येथील कच्छ युवक संघ, गुजराती समाज व जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) पेणमधील जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्वधर्मियांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या वेळी डॉ. विनिता राव, डॉ. रवींद्र आत्तारडे, डॉ. स्वप्नील श्रीलंकर तसेच वैद्यकीय सहकारी धनेश शहा, राजेश गाला, रोनक गाला, आकाश शहा, संदीप पूनमिया, अमित भंडारी, नरेंद्र जैन, विजय शहा यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply