Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या तरुणास बेड्या

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील चेरीवली येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने वाजे येथून गजाआड केले आहे तसेच त्याच्याकडून अपहृत मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

पनवेल तालुक्यातील चेरवली येथून एक 16 वर्षीच्या अल्पवयीन मुलगी हायस्कुला जाते असे सांगुन घराबाहेर पडली, मात्र पुन्हा घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. घटनेचे गांभार्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अम्बिका अंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, महेश धुमाळ, प्रकाश मेहर आदींच्या पथकाने यासंदर्भात अधिक तपास करत असताना त्यांना अपहरीत मुलगी एका व्यक्तीसोबत सतत संपर्कात असल्याचे निर्दशनास आले.

याप्रकरणी पोलिसांचे एक पथक चौक येथे जावून संशयीत मुलाचे मोबाईलचे तांत्रिक तपास करीत असताना त्यातील मोस्ट कॉलर यास ताब्यात घेऊन गुन्हयाची चौकशी केली असता त्याने एका 23 वर्षीय तरुणाने एका मुलीचे अपहरण करून तिला चौक येथे लपवून ठेवले असल्याचे माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याकडून अपहृत मुलीची महिला पोलीस अमलदारांकरवी सुरक्षितरित्या सुटका केली.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply