Breaking News

शेतकरी संघटनांचे कृषी कायद्यांना समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.
याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर म्हणाले, अखिल भारतीय किसान समन्वय समितीशी संबंधित उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, बिहार, हरियाणासह वेगवेगळ्या राज्यांतील 10 शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांवर सरकारला समर्थन दिले आहे. मोदी सरकारने हे तीन कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हितासाठी आणले आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत असून, आमचा त्याला पाठिंबा असल्याचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.
’आम्ही शेतकर्‍यांशी कृषी कायद्यांबाबत बोलण्यास तयार आहोत. टप्प्याटप्प्याने चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. शेतकर्‍यांकडून प्रस्तावावर चर्चेचा प्रस्ताव असल्यास पुढील वाटाघाटी सुरू करू,’ असेही तोमर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply