Breaking News

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी

मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे.

जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम होतो. तसेच लहान माशांना खाणारे मोठे मासेदेखील अन्नाच्या अभावामुळे त्या भागातून स्थलांतर करतात. गेल्या काही दिवसांपासून मुरूडच्या समुद्रात केसरी रंगाच्या जेलीफिशची संख्या वाढल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी जेलीफिशचे थवे येत आहेत. त्यामुळे मुरूड तालुक्यातील मच्छीमारांवर मत्स्यदुष्काळाचे संकट ओढवले आहे. जाळ्यात अडकलेले जेलीफिश बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांना त्यांना हात लावावा लागतो. मात्र जेलीफिशच्या स्पर्शाने मच्छीमारांच्या हाताला खाज व सूज येत आहे. अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळानंतर आता जेलीफिशचा सामना करावा लागत असल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार त्रस्त झाले आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply