Breaking News

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 94,22,636 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,43,709 कोरोना संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. आता भारतात कोरोनावर मात करण्यात येत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढला आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply