Breaking News

नेरूळमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी

प्रभाग क्रं 85 मध्ये नेरूळ सेक्टर 6च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले.

हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाता पाटील यांच्या पुढाकाराने व नवी मुंबई भाजपचे युवा नेतृत्व सुरज पाटील आणि प्रभाग 86च्या भाजप नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर पार पडले.

गुरूवारी (दि. 17) कुकशेत गावातील भाजप जनसंपर्क कार्यालयातआणि शुक्रवारी (दि. 18) नेरूळ सेक्टर 6 येथील जनसंपर्क कार्यालयात हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कोरोनाचे सावट अजूनही काही प्रमाणात असताना कोरोना महामारीच्या धक्यातून अजून रहीवाशी व ग्रामस्थ बाहेर निघालेले नसतानाही दोन दिवसीय आरोग्य शिबिरात रहिवाशी व ग्रामस्थांनी सहभागी होत स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेतली. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी स्वत: रहिवाशांशी संपर्क साधून आरोग्य शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या वेळी ग्रामस्थांनी व रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले.

प्रभाग 96 मध्ये आज शिबिर

नवी मुंबई : महापालिका प्रभाग 96 मध्ये नेरूळ सेक्टर 16 परिसरात आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून शनिवारी (दि. 19) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक गणेश भगत आणि भाजप नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांच्या पुढाकारातून हे शिबिर होणार आहे.

नेरूळ सेक्टर 16 मधील भाजप नगरसेविका जनसंपर्क कार्यालय, सेंचुरी सोसायटी, ए-6, 0:14, सेक्टर-16, छत्रपती संभाजी राजे उद्याना शेजारी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तसेच शिबिरात मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. नेरूळ सेक्टर 16, 16अ आणि 18 मधील रहीवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply