उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलमधील 1991-92च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आयोजित स्नेहमेळावा कर्जत येथील नाना-नानी फार्म हाऊस येथे झाला.
शालेय जीवन संपले की शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी-धंदा या कारणामुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी असल्या तरी एकत्र येणे अशक्य असते. त्यात संसारिक प्रपंच वाढल्याने सर्वच जण व्यस्त होतात. त्यामुळे उरण येथील वीर वाजेकर हायस्कूल मधील 1991-92 बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन मेळाव्याचा आनंद घेतला. या वेळी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जनजागृती, आदिवासी मुलांना कपडे, खाऊ, शालोपयोगी वस्तू वाटप, असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी असे मेळावे आयोजित करण्याचे ठरले आहे.
या मेळाव्यात दिनेश तांडेल, मिलिंद पाटील, मिनल पाटील, निम्मी खान, भारत कडू, छाया ठाकूर, मधुमती वर्तक, अमरनाथ म्हात्रे, कौशिक ठाकूर, मंगेश पाटील, लिलाधर ठाकूर आदींनी सहभाग घेतला होता.