Breaking News

तळोजा परिसरातील हवा प्रदूषित

प्रदूषण नियंत्रण महामंडळाने लक्ष देण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – तळोजासह परिसरातील हवेमधील प्रदूषक घटकांची वाढ झाली आहे. वातावरण या संस्थेने केलेल्या मोजणीमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा वेळी मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही वातावरण संस्थेने केली आहे.

तळोजा, खारघर आणि पनवेल परिसरात वातावरण संस्थेने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा पाच ठिकाणी कार्यरत केली. त्यातील नोंदीनुसार सकाळी 6 ते 8 या वेळेत ‘पीएम 2.5’ या प्रदूषक घटकाची पातळी ही निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार ‘पीएम 2.5’ या घटकाचे प्रमाण सरासरी 50 ते 100 (मायक्रो घनमीटर) इतके असेल तर ते समाधानकारक मानले जाते, तर 100 ते 200 हे प्रमाण मध्यम पातळी ठरते. सर्व ठिकाणी ‘पीएम 2.5’ हे प्रमाण 100 ते 200 दरम्यान नोंदविण्यात आल्याचे वातावरण संस्थेच्या आकडेवारीवरून दिसून येते. तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये ‘पीएम 2.5’ची पातळी सर्वाधिक म्हणजे 197.1 नोंदविण्यात आली.

हवेची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा त्वरित कार्यरत करण्याची गरज आहे, असे वातावरण संस्थेचे भगवान केसभट यांनी सांगितले. या नोंदींचा विस्तृत अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, तळोजा एमआयडीसीत विविध कारखाने आहेत. त्यातील प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply